जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । येथील जैन महिला मंडळाचा ५४ वा वर्धापन दिन केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रमात नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी ५४ खुर्ची देखील भेट देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, संजय काळे, श्रीकांत वाणी, महिला मंडळ सल्लागार कमलबाई अग्रवाल, शैला मयूर, प्रीती चोरडिया, दीप्ती अग्रवाल, टीना संघवी, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया उपस्थित होते. नीलिमा रेदासनी, गरिमा कोचर, दीपा राका, चेतना ललवानी यांनी स्वागत गीत म्हटले. वृद्धाश्रमास ५४ खुर्ची भेट देण्यात आल्या. या कार्यात रत्ना जैन, ज्योती जैन, ज्योत्स्ना रायसोनी, कलावती चोरडिया, रिता नवलखा, अनिता कांकरिया, ताराबाई रेदासनी यांनी सहकार्य केले.