गुन्हेजळगाव जिल्हा

तीन जणांची टोळीला जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यात गंभीर गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्यान्वयेसह हद्दपारीची कारवाई केली जात आहे. अशातच भुसावळ येथील तीन जणांच्या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आज दुपारी १२ वाजता दिले.

यात टोळी प्रमुख मुकेश प्रकाश भालेराव (वय-२७, रा. राहुलनगर, भुसावळ), टोळी सदस्य शामल शशिकांत सपकाळे (वय- २७, रा. न्यू. सातारा, भुसावळ), भरत मधुकर महाजन (वय-२७, रा. शिवपूर, भुसावळ) यांच्यावर कारवाई केली आहे.

भुसावळ शहरातील टोळीने गुन्हे करणाऱ्या या तिघांवर भुसावळ शहर व तालुका, शनिपेठ पोलिस ठाणे, यावल, फैजपूर अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये २६ गंभीर गुन्हे आहेत. या टोळीमुळे नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी पाठवला होता.या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंजुरी देत मुकेश भालेराव, भरत महाजन व शामल सपकाळे या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button