⁠ 
रविवार, मे 5, 2024

Jalgaon : रिक्षाचालकाची लेक आणि शेतकरी तरुणाची पत्नी बनली पोलीस उपनिरीक्षक..

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील एका रिक्षा चालकाच्या मुलीनं आणि शेतकऱ्याच्या पत्नीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. दिपाली निंबा सुर्यवंशी असं या तरुणीचं नाव असून तिने अजून एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. MPSC कडून घेण्यात आलेल्या क्लार्क पदासाठी देखील तिची निवड झाली आहे.

दिपाली सूर्यवंशी यांचे भुसावळ येथील माहेर असून त्यांचे वडील निंबा सूर्यवंशी हे रिक्षाचालक आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून निंबा सूर्यवंशी हे रिक्षातून प्रवासी वाहतूक करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. निंबा पाटील यांना पाच मुली मात्र त्यांनी मुलींच्या शिक्षणाात कुठलीच कसर सोडली नाही. सर्वांना उच्चशिक्षण देत त्यांनी त्यांचं लग्न करुन दिलं. पाच बहिणींमध्ये दिपाली ही सर्वांत लहान होती. बेताच्या परिस्थितीतच दिपाली यांनी समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. लहानपणपासून वडिलांच कष्ट डोळ्यांनी बघितल्याने दिपाली यांनी शासकीय नोकरीचं स्वप्न बघितलं होतं. स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल सुरु करण्यापूर्वीच याचदरम्यानच्या काळात २००८ मध्ये दिपाली यांच लग्न झालं.

लग्नानंतरही मात्र दीपाली थांबली नाही. लग्नानंतर एक मुलगा झाला. तिला तिनं पाहिलंलं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. अखेर तिने मुलाला सोबत घेत माहेरी गाठलं. पती आणि सासरच्यांपासून माहेरी राहत तिने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास अन् तयारी केली. सात वर्षांच्या मेहनतीनंतर तिने तिचं स्वप्न सत्यात उतरविलं आहे

शिरपूर तालुक्यातील अर्थ हे गाव दिपाली यांच सासरं. समाधान सोमा पाटील हे दिपाली यांचे पती, समाधान पाटील हे शेती करतात. मात्र, दिपाली यांनी दिपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात क्लास लावून याठिकाणच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरु केली. 

दिपाली सांगतात की त्यांनी तयारी करतांना अस कुठलं पदासाठी अभ्यास करायचं ठरवलं नव्हतं. फक्त शासकीय नोकरी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर तिच्या मेहनतीला २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिला यश आलं. या परीक्षेचा नुकताच जाहीर झाला असून यात तिची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाली. विशेष याचकाळात क्लर्क पदासाठी दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुध्दा दिपाली उत्तीर्ण झालीय, एकाचवेळी दोन नोकऱ्यांचा असा अनोखा योगायोग दिपालीच्या आयुष्यात आला. यात तिने पोलीस उपनिरिक्षक पदाची निवड करत अंगावर वर्दी चढविण्याच ठरवलं आहे.