---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवणे पडेल महागात; अशी होऊ शकते शिक्षा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३ । नवीन तंत्रज्ञान सहजपणे असल्याने आपले काम सहज सोपे व्हावे म्हणून उपयोगी ठरणारे हे तंत्रज्ञान आज तितकेच धोक्याचे ठरताना दिसून येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या गोष्टी घडाव्या, असा हेतू असताना चुकीच्या गोष्टीच घडताना दिसून येत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे.

social media jpg webp webp

सध्या ‘फेसबुक’च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या नावे ‘फेक अकाउंट’ तयार करून त्याद्वारे फसवणूक व बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘सोशल मीडिया’वर ‘फेसबुक’च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून विशेषतः मुली आणि महिलांना बदनाम करण्याचे प्रकार वाढले आहेत.

---Advertisement---

त्यांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोच्या आधारे दुसरे सेम अकाउंट तयार करून त्यांची बदनामी केली जात आहे. फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी करणे हा प्रकार देखील आता जणू एक ट्रेंडच बनला आहे नाहीतर चेष्टा करण्याचा मार्ग. यामुळे अनेकजण मानसिक दबावाखाली जात असल्याचे दिसून येत आहे.

फेक अकाउंटबाबत फेसबुकला तक्रार केली तर अशी अकाऊंट ब्लॉक केली जातात. त्यामुळे फेक अकाऊंट असल्याचा संशय आल्यास तत्काळ सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवायला हवी. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याबाबत तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. सोशल मीडियावरून मुली आणि महिलांच्या बदनामी, पैशांची मागणी असे प्रकार नित्याचेच होत असले तरी याबाबत गुन्हा नोंद होत नसल्याने या भामट्यांचे धाडस वाढतच आहे.

“तंत्रज्ञान जेवढे फायद्याचे तेवढेच नवीन पिढीला गुन्हेगारीकडे घेऊन जाण्यास कारणीभूत आहे. फेक अकाऊंट तयार करणाऱ्या आरोपीस आय. टी. अॅक्ट ६६ (सी),६६(डी) ६६(ई),६६(एफ) नुसार कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आपल्याला जागरूक असणे आवश्यक आहे.” -अॅड. अविनाश के.पाटील, नोटरी भारत सरकार, जळगाव.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---