डंपरने दिली रिक्षाला धडक अन् झाला भीषण अपघात : सहा जण गंभीर

navapur jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । नवापूर तालुक्यातील श्रावणी रेल्वे गेट जवळ डंपर आणि रिक्षाच्या भीषण अपघात झाला या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खांडबारा नजीक श्रावणी रेल्वे गेटजवळ प्रवाशी रिक्षा क्रमांक जी जे 38 डब्ल्यू 1548 ही डोगेंगावहून खांडबाराच्या दिशेने येत असताना जी जे 16 एक्स 8359 क्रमांकाच्या डंपर हा श्रावणी रेल्वे गेटच्या दिशेने जात असताना रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली.अपघात इतका भीषण होता की अपघात होताच मोठा प्रमाणावर मोठा आवाज झाला व आजूबाजूचे लोकांनी आवाज ऐकून अपघात स्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली एका खाजगी वाहन द्वारा अपघातग्रस्तांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला 

या अपघातात सुरेश संजय गावित, सविता अनिस वळवी राहणारी जामदा, अमिरा दिनेश वळवी राहणार मौलीपाडा, भामटी अरविंद राहणारी मौलीपाडा,अनेस तिकडे राहणार जामदा व रिक्षा चालक असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना डोक्यावर तोंडावर हातापायाला गंभीर दुखापत झाली आहेत तसेच तीन रुग्णांना गंभीर इजा झाल्याने त्यांना खांडबारा येथे प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आला आहे

घटनेची माहिती मिळताच खांडबारा पोलीस घटनास्थळी दाखल झाली होती  घटनास्थळी वाहतूक कोंडी खांडबारा पोलिसांनी सुरळीत केली. मागील अनेक दिवसांपासून खांडबारा ग्रामीण रुग्णालय १०८ रुग्णवाहिकेची सेवा नियमित मिळत  नसल्याने अनेक रुग्णांचे अपघातग्रस्तांच्या हाल होत आहेत.याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी केली व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now