⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | बातम्या | शहिदांच्या वीरपत्नींची जिल्हाधिकाऱ्यांकडे एक मागणी; वाचा तुमचेही डोळे पाणवतील

शहिदांच्या वीरपत्नींची जिल्हाधिकाऱ्यांकडे एक मागणी; वाचा तुमचेही डोळे पाणवतील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ सप्टेंबर २०२३ | जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात हुतात्मा स्मारक उभारले जात आहे. या स्मारकावर केवळ सैन्य दलातील शहिदांची नावे तसेच त्यांची गाथा लिहिली जाणार आहे. या हुतात्मा स्मारकावर सैन्य दलाव्यतिरिक्त निमलष्करी तसेच विविध संरक्षण सेवेत कर्तव्य बजावून देश सेवेचे काम करताना शहीद झालेल्या जवानांनाही स्थान देत त्यांची शौर्यगाथा साकारावी, अशी मागणी जिल्ह्यातील शहिदांच्या वीर पत्नींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मेहरुण तलाव परिसरातील स्मारकावर सैन्य दलासह निमलष्करी तसेच विविध संरक्षण सेवेत कर्तव्य बजावून देश सेवेचे काम करताना शहीद झालेल्या जवानांचीही नावे तसेच त्यांची ही विरगाथा लिहिली जावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी निमलष्करी तसेच विविध संरक्षण सेवांमध्ये देश सेवा करत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीय सुद्धा सोबत होते.

अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शहिद जवानांच्या पत्नींनी भावनाही मांडल्या. निमलष्करी दलातील शहिद जवानांची संख्या मोठी आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबीसारख्या निमलष्करी दलात जिल्ह्यातील शेकडो जवानांकरवी सेवा दिली जात आहे. निमलष्करी दलातील जवान शहिद झाल्यावर त्यांच्यावर शासकीय संहितेनुसार अंत्यसंस्कार होतात.त्यामुळे सादर करीत असलेल्या शहिद जवानांची शौर्यकथा नियोजित स्मारकात साकारण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी भारती कोल्हे, फरीदा बी, वंदना पाटील, अर्चना नरेंद्र महाजन यांनी भावना मांडल्या. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, सचीव महेंद्र सपकाळे, उपमहानगराध्यक्ष आशीष सपकाळे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, राजेंद्र निकम, श्रीकृष्ण नेमाडे, सागर शिंपी, विज सपकाळे, नितीन जोशी आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह