⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सावद्याच्या कोष्टी महिलांचा स्तुत्य उपक्रम, रक्षाबंधनासाठी सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । रावेर तालुक्यातील सावदा येथे “एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी ” हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील देशाच्या सीमेवरील जवानांन करीता अमृत महोत्सवाचे आवचित्त्य साधून कोष्टी वाड्यातील, कोष्टीमहिला मंडळाने कोष्टी वाड्या सह परिसरातील महिलावर्गाने एकत्रितपणे रक्षाबंधन हा सण देशाच्या रक्षण रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या तसेच ऊन, वारा, पाऊस, हिवाळा ,उन्हाळा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता प्राणहातावर घेऊन आपल्याला घरा घरात सुखाची झोप देणाऱ्या अश्या सीमेवरील आमचे “भाऊ ” जवानांसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी ६ ऑगस्ट पर्यंत एकत्रितपणे जमा केलेल्या रक्कमेमधून जम्मू आणि काश्मिर, कारगिल, उत्तर प्रदेश व अरुणाचल प्रदेश येथील सीमेवरील जवानांसाठी 100-100 राख्या Speed Post द्वारे पाठवल्या आहेत. दरम्यान, जम्मु काश्मीर येथे सुरक्षा जवान हा सुट्टी घेऊन सावदा येथे आल्याने येघिल कोष्टी महिला मंडळाने त्यास पुष्प देऊन तसेच रक्षाबंधनाचे अवचित्य साधून त्यास मांडळा तर्फे राखी बंधांण्यात आली.

भारतात साजरा होणाऱ्या विविध सण उत्सवात आपल्या सीमेवरील सैनिकांना सहभागी होता येत नाही. सैनिक निस्वार्थपणे आपल्या परिवाराची काळजी न करता देशहितासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून सदैव तत्पर असतात. म्हणून महाराष्ट्रातील महिला वर्गाने रक्षाबंधन हा सण सैनिकांच्या या निस्वार्थ सेवेला सन्मान देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्यासोबत करण्याचे ठरवले आहे.या उपक्रमात विशेषतःनेत्रा गणेश कोष्टी, स्वाती अभिजित कोष्टी, ,नेहा संजय बन्नापुरे , याच्या सह वैशाली राजेंद्र कोष्टी , लता सुभाष कोष्टी ,सुनीता सुरेश कोष्टी ,उर्मिला संजय गरडे,सुशीला बारघरे,मनीषा सुधाकर कोष्टी,वैशाली सतीश नारळे,अपेक्षा योगेश कोष्टी,योगिता चंद्रकांत कोष्टी, रुपाली विकास बावणे ,अनिता रेवाले, ज्योती प्रशांत सरोदे.यशविते करीता परिश्रम घेतले.