जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । एरंडोल येथील रहिवासी नितीन उत्तम जयस्वाल यांनी येथील एसबीआय शाखेत अपघाती विमा ५०० रुपये भरून काढला होता. काही महिन्यापूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या वारसांना विम्याचा १० लाखांचा धनादेश नुकताच देण्यात आला.
एरंडोल एसबीआयचे व्यवस्थापक आशीष मेढे यांनी वारसदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याने विमा मंजूर झाला. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर, त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास विम्याची रक्कम उपयोगी ठरणार आहे. मृत जयस्वाल यांच्या पत्नी खुशबू जयस्वाल यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
यावेळी मृताचे मोठे बंधू संदीप जयस्वाल, पत्नी खुशबू जयस्वाल व त्यांचा मुलगा व मुलगी यांचेसह सहाय्यक प्रबंधक मुकेश दलाल, क्षेत्रीय प्रबंधक सौरव पाटील, शाखा व्यवस्थापक अनुराधा नंदनवार, लेखापाल आशिक सोनवणे, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे कर्मचारी राहुल कदम, सचिन वैद्य उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका; जळगावमध्ये कसं असेल हवामान?
- खुशखबर ! जळगावात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचा भाव घसरला..
- Bhusawal : पर्यायी ट्रान्सफॉर्मरने श्रीनगर मधील वीज पुरवठा सुरळीत करा; प्रा. धिरज पाटील
- उत्तर महाराष्ट्राला केंद्राचं गिफ्ट! जळगाव ते मनमाड आणि भुसावळ ते खंडवा रेल्वे प्रकल्पांना मंजूरी
- जळगावात शेतकऱ्याच्या कापसाला हमीभावही मिळेना; ‘या’ भावात केला जातोय खरेदी?