जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. जळगाव तालुक्यातील एक २७ वर्षीय महिलेसोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच जबरदस्तीने गर्भपात देखील केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका महिलेची गणेश निवृत्ती सपकाळे रा.भादली ह.मु.पुणे याच्याशी ओळख होती. फेब्रुवारी ते मे २०२२ दरम्यान गणेश याने मोबाईलमध्ये पीडितेसोबत असलेले फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी जळगाव आणि पुणे येथे तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुणे जिल्हा रुग्णालयात जबरदस्तीने तिचा गर्भपात देखील केला.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.