जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । महिलेने व्यवसायासाठी दिलेले दीड लाख रुपये मागितल्यानंतर संबंधिताने करंट लावून ठार मारण्याची धमकी देत पैसे परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे की, कोकिळा भगवान सोनवणे (50, रा.दादावाडी, पिंप्राळा) यांचे पिंप्राळा परीसरातीलच सोनी नगर येथे ज्योतिबा फ्रुट कंपनी आहे. या माध्यमातून त्या केळीसह इतर फळ विक्री करण्याचे काम करतात. 10 जून 2023 रोजी श्रीकृष्ण तुकाराम मेघडे (रा. मुरली मनोहर अपार्टमेंट सावखेडा रोड, सोनी नगर, जळगाव) याने कोकिळाबाई सोनवणे यांच्याकडून व्यवसाय करण्याकरता दीड लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर दोन महिन्यांनी महिलेने श्रीकृष्ण मेगडे याला पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याने मी पैसे देत नाही असे सांगून तुला करंट लावून मारून टाकेल, अशी धमकी दिली.
दरम्यान, महिलेने शुक्रवार 15 डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेघडे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.