जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । शहरातील खोटेनगर स्टॉपवर पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक देवून नुकसान केल्याची घटना २७ रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खोटे नगर जवळ बुधवार २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आयशस क्रमांक (एमएच १८ बीजी ४८००) ही जळगावकडून धुळ्याकडे जात असतांना वरील चालक परवेज खान हासीन खान (वय ३९) रा. खरगोन मध्यप्रदेश याने परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात परवेज खान हासीन खान हा जखमी झाला.
तर वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरूवार २८ जुलै रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.