भुसावळ

वाहनधारकांना मोठा दिलासा.. भुसावळातील रेल्वे लोखंडी बोगदा ‘या’ दिवसापासून सुरू होणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ ।
भुसावळ सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत शहरातील श्री संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी ब्रीज या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरणाचे पूर्ण करण्यात आले आहे. हा रस्ता 23 सप्टेंबरपासून वाहतूकीस खुला केला जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच रस्ता काँक्रीटीकरणानंतर दोन्ही बाजूंना शिल्लक राहणार्‍या दीड ते दोन फुट जागेवर आता पालिकेने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे नियोजन केले आहे. रस्ता वाहतूकीसाठी खुला होण्यापूर्वी हे काम केले जाणार आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत शहरातील पालिकेचे श्री. संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पुलापर्यंत आरसीसी रोड गटार बनवणे या काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले. 248 मिटर लांब व 12 मिटर रुंदीचा हा रस्ता ठेकेदाराने अवघ्या 18 दिवसांत पूर्ण केला. सध्या क्युरिंगसाठी बंद असलेला हा मार्ग आता शुक्रवारपासून सुरू होईल. या मार्गावर दोन्ही बाजूंनी दीड ते दोन फुटाची जागा असून या ठिकाणी आता पालिकेने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे नियोजन केले आहे.

रस्ता वाहतुकीसाठी सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. यामुळे या रस्त्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवापूर्वी हा मार्ग वाहतूकीसाठी खुला होत असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Back to top button