---Advertisement---
बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला खाजगी शाळांकडून केराची टोपली…

---Advertisement---

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । चाळीसगांव मध्ये काही खाजगी शाळा पालकांकडून सक्तीने पूर्ण फी वसुल करत आहेत..तर काही शाळा पालकांची अडवणूक तसेच त्यांना दमदाटी करून फी वसूल करत आहे.असा काहीसा प्रकार चाळीसगाव मध्ये समोर आला आहे.फी वेळेवर भरली नाही म्हणून काही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन होणारे लेक्चर शाळेकडून बंद करण्यात येतात.आधी राहिलेली फी भरा मग लेक्चर सुरू करू अशी एक प्रकारे पालकांची अडवणूक शाळेकडून केली जाते आहे. तर काही पालकांकडून असे सांगण्यात आले की फी न भरल्यामुळे चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुद्धा घरी दिल्या जात नाही.अगोदर फी भरा मगच प्रश्नपत्रिका दिल्या जातील असे शाळेकडून सांगण्यात येते.

---Advertisement---

शासनाने 15%फी सवलतीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आणि शाळेने फी संदर्भात पालकांची कोणतीही अडवणूक करू नये असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानंतर सुद्धा चाळीसगाव मध्ये काही खाजगी शाळा मात्र शिक्षणमंत्री यांच्या आदेशाचे पालन करतांना दिसत नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---