⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | पिस्तूल रोखत भर रस्त्यावर बँक व्यवस्थापकाला लुटले, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

पिस्तूल रोखत भर रस्त्यावर बँक व्यवस्थापकाला लुटले, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । जिल्ह्यातील बचत गटांना दिलेल्या कर्जाचे पैसे वसूली करणाऱ्या खासगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवत त्याच्याकडून बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा एकुण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार विटनेर गावालगत भरदिवसा रस्त्यावर घडला. या घटनेमुळे जळगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुनील शेषराव पाढाळे (वय-२६) रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ह.मु. हिवरखेडा रोड जामनेर हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (एनबीएफसी) या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून बचत गटाच्या पैसे वसूलीचे काम करतात.

सुनील पाढाळे हे मंगळवारी कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.२०.डीजे.१६६० वरून गेले होते. परिसरातील पाच बचतगटांच्या महिलांकडून एकूण ९५ हजार ८७३ रुपयांची त्यांनी वसुली केली होती. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वराडमार्गे विटनेरकडे दुचाकीने जात असताना दुपारी १ वाजेच्या सुमारास वराड आणि विटनेर गावाच्या रस्त्यावर त्यांचा मागून अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग करत आले. सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जात त्यांनी दुचाकी आडवी केली. तिघे दुचाकी समोर अचानक आल्याने सुनील यांनी अचानक ब्रेक लावला व ते खाली पडले.

दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याजवळ येऊन २ चापटा मारल्या व त्यांच्या खांद्याला लावलेले पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील यांनी याला विरोध केला असता त्यातील एकाने कमरेतून पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावली. म्हणाला की, “बॅग सोड नाहीतर गोळी मारेल” अशी धमकी दिली. पैश्यांची बॅग जबरी हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या बॅगमध्ये ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील पाढाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करीत आहे.

author avatar
Tushar Bhambare