जळगाव शहरात ७ वर्षीय चिमुकलीचा केला विनयभंग !

जळगावमधील एका भागात सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अर्शद रब्बू पटेल (21, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.

crime 12 jpg webp

सहा वर्षीय चिमुकली जळगाव शहरात आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 15 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पीडीता ही घरी असताना संशयित आरोपी अर्शद रब्बू पटेल (21) याने तिला जवळ बोलून तिच्याशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडीतेच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी अर्शद रब्बु पटेल (21) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now