जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। शिरपूर येथील दुर्बड्या येथे सहा वर्षाच्या बालकास घराशेजारच्या इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून तो बेशुद्ध झाला. हर्षल अनिल पावरा (वय ६) याला तत्काळ पालकांनी वकवाड आरोग्य केंद्रात आणले. बालकाचा मृत्यू झाल्याची शंका आल्यामुळे हर्षलाच्या आईची अवस्था बिकट झाली होती.
परंतु, आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्या प्रयत्नाने बालकाचे बंद ठोके व पल्स सुरू करण्यात यश आले. त्यानंतर तत्काळ बालकाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, शिरपूर येथे पाठविण्यात आले.
घटनेबाबत माहिती प्राप्त होताच तालुका आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांनी प्रा. आ.केंद्र वकवाडचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांना निर्देश दिलेत व मार्गदर्शन केले. तसेच, संबंधित बालकाला वाचवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिम्मतसिंग गिरासे यांना यश आले. पालकांनी आपल्या बालकाला सुखरूप अवस्थेत पाहून समाधान व्यक्त केले.