जळगावच्या जलतरण तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जून 19, 2023 9:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२३ । तलावात पोहोण्याचा मोह एका २४ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडलीय.

salman shaikh jpg webp

सलमान शकील बागवान (वय २४, रा.जोशीपेठ, बागवान वाडा) असे मयत तरूणाचे नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील जोशी पेठेतील बागवान वाड्यात सलमान हा आई, वडील शकील बागवान, मोठा भाऊ व तीन बहिणींसोबत राहत होता. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने, सलमान सुट्टीच्या निमित्ताने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मित्रांसोबत जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जलतरण तलावात पोहायला आला होता.

यादरम्यान, सलमान तलावातील जास्त खोली असलेल्या भागात पोहत होता, त्याठिकाणी खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. जलतरण तलावातील सुरक्षा रक्षकांना बोलावून, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

प्रशिक्षकांच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान, क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात जोशी पेठ व बागवान वाड्यातील सलमानच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती . घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now