---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

चौथ्या मजल्यावरून पडल्याने १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू ; जळगावातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गतीमंद असल्याने कोठेही निघून जाते म्हणून फ्लॅटमध्ये कुटुंबीयांनी १९ वर्षीय तरुणीला कोंडून ठेवलं होते. मात्र गॅलरीतून साडीच्या मदतीने खाली येण्याच्या प्रयत्नात चौथ्या मजल्यावरून डोक्यावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. प्रेरणा विजय गजरे (वय १९) असं मृत तरुणीचे नाव असून ही घटना जळगाव शहरातील मुंदडा नग्रातील साई लक्ष अपार्टमेंटमध्ये घडली.

prerana gajare

यावलचे माजी नगरसेवक विजय गजरे यांची ती मोठी मुलगी आहे. मूळचे यावल येथील रहिवासी असलेले विजय गजरे हे जळगावातील मुंदडा नगरात साई लक्ष अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर फ्लॅट भाड्याने घेऊन काही महिन्यांपासून वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली आहेत. तर पती-पत्नी विभक्त राहतात. त्यांची पत्नी जळगावातील डॉ. आंबेडकर नगरात राहते. त्यांच्याजवळ लहान तर मोठी प्रेरणा (वय १९) विजय गजरे यांच्या सोबत राहते. मंगळवारी विजय गजरे हे कॉंग्रेसचे उमेदवार अनिल शिंदे हे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याने त्यासाठी अमळनेर जाणार होते. प्रेरणा ही कोठेही निघून जात असल्याने त्यांनी चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ठेवून बाहेरुन कुलूप लावून ते अमळनेरकडे रवाना झाले. धरणगाव पर्यंतच पोहचले असताना त्यांना अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांनी प्रेरणा चौथ्या मजल्यावरून पडल्याचे फोनवरून कळवले

---Advertisement---

दरवाजा उघडून साडीने खाली येण्याचा प्रयत्न
विजय गजरे हे राजकीय क्षेत्रात असल्याने व सध्या विधानसभा निवडणूक असल्याने ते सतत बाहेर जात असत. तर प्रेरणा हीला एकटीला घरात ठेवून जात. दुपारी दीड वाजेच्या सुमारास तीने फ्लॅटच्या गॅलरीचा दरवाजा उघडून कठड्याला घरातील दोनतीन साड्या एकमेकाला गाठ मारून खाली सोडल्या. त्याच्या मदतीने खाली येण्याचा प्रयत्न केला असता ती खाली डोक्यावर पडली, तिला शेजारी व गजरे यांच्या मित्रांनी जीएमसीत दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---