जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । यावल शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील रहिवासी पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १५ रोजी दुपारी १२ वाजेनंतर बेपत्ता झाली. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
त्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला काही तरी आमिष दाखवत व फूस लावून पळवून नेले असावे, अशी खात्री झाली. शुक्रवारी रात्री उशीरा पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करत अाहेत.