---Advertisement---
चाळीसगाव गुन्हे

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, गुन्हा दाखल

crime (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात सध्या अल्पवयीन मुली पळवून घेऊन जाण्याच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच चाळीसगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

crime (1)

काय आहे घटना?
चाळीसगाव शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २:२५ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर मुलगी घराचा काम सुरू असलेल्या ठिकाणी वडिलांना चहा देण्यासाठी गेल्या असताना हि घटना घडली. त्यावर घरच्यांनी तिला परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही.

---Advertisement---

यावर चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---