धक्कादायक ! अत्याचारातून 14 वर्षीय मुलीने दिला बाळास जन्म

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगाव तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भादलीत राहणाऱ्या एका परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षापासून अत्याचार केला. या अत्याचारातून बाळास जन्म दिला. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत असे की, जळगाव तालुक्यातील भादली गावात मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवाशी असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या पालकांसह गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणारा संशयित आरोपी चमासिंग बिलाला (वय २२) याने अल्पवयीन मुलीला गेल्या दोन वर्षांपासून तिच्या अत्याचार केला.
या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी चमासिंग बिलाला याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.