गोदावरी आजींसह डॉ केतकी पाटील यांनी केले कार्याचे स्मरण
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्तोत्र श्रीमती गोदावरी पाटील (आजी) व संचालिका तसेच भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
सर्वप्रथम गोदावरी आजी यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या नंतर डॉ केतकी ताई पाटील यांची प्रतिमेस फुल वाहून अभिवादन केले. यावेळी गोदावरी आजी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली. तसेच डॉ केतकी पाटील यांनी देखील महेश्वर येथील वर्णन केले. या प्रसंगी राधा नायर, स्वरूपा कामडी, प्रतीक्षा, किशोर चौधरी, हिम्मत धनगर यांच्यासह गोदावरी परिवारातील सदस्य उपस्थित होते.