जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । भुसावळ शहरात बुधवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून या डबल मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
या हत्याकांड प्रकरणी आठ संशयीतांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या आठ संशयतांपैकी एकाच भुसावळ मधून तर दुसऱ्या संशयित हा गुजरात मध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून या हत्याकांडात अजून किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.