गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे माजी विदयार्थ्यांचे ऑनलाईन चर्चासत्र मालिका संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे दि २० ते २५ मे दरम्यान ऑनलाईन माजी विदयार्थ्यांचे चर्चासत्र मालिकेचे आयोजन करण्यात आले. यात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगावात शिकुन सध्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.
विविध विषयाच्या विभागातर्फे आयोजित या मालिकेत दि २० रोजी मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे रोग व्यवस्थापनात टेलिमेडिसिन आणि दूरसंचाराची अंमलबजावणी करणे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी धनंजय जोशी सामुदायिक आरोग्य अधिकारी,यावल, दि २१ मे रोजी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे समुदाय आरोग्य नर्सिंगचे भविष्य: ट्रेंड, संधी आणि धोके या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जकिरा अकील पटेल असोसिएट प्रोफेसर सिंधुताई विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, नाशिक, दि. २३ मे रोजी बाल आरोग्य नर्सिंगतर्फे व्हीटॅमिन्स वर पायल हांडे प्राध्यापक प्रभादेवी नर्सिंग स्कुल चंद्रपूर दि २४ मे रोजी प्रसुती आणि स्त्रीरोग विभागातर्फे सुरक्षित मातृत्व,अर्थ आणि महत्व प्राजक्ता वळवी नर्सिग ऑफीसर शासकिय वैद्यकिय महा.व हॉस्पीटल धुळे, दि २५ रोजी मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फेे चिंता विकार विषयावर रुपाली सत्यपाल मून सीआय, सुरटेक कॉलेज नर्सिंग, नागपूर, विविध विषयांच्या ऑनलाईन वेबिनार मालिकेतून प्राध्यापक व विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून आगामी काळातही अशा वेबिनार मालिका सतत सुरू राहणार असल्याचा मानस प्राचार्य विशाखा गणविर यांनी व्यक्त केला.
कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागप्रमुख प्रा. जसनिथ ढाया, जळगाव,प्रा निर्भय मोहोड सहायक प्राध्यापक, बाल आरोग्य नर्सिंग विभागप्रमुख प्रा.अश्वीनी मानकर,प्रा. पायल वाघमारे,प्रसुती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख प्रा.मिनोव देवी,प्रा थळाथन निम्मी वर्गीस मानसिक आरोग्य नर्सिंग विभागप्रमुख प्रा. अश्वीनी वैदय,प्रा हेमांगी हेमंत मुरूकूटे, मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागप्रमुख प्रा. मनोरमा इसाक,प्रा. शुभांगी ईश्वरदास गायकवाड तसेच शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले