⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांनो काळजी घ्या! 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार, IMD चा अंदाज

जळगावकरांनो काळजी घ्या! 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार, IMD चा अंदाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मात्र जळगावात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज आहे. जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे.

जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकतो आहे. दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना तापमानापासून दिलासा मिळाला होता. आता पुन्हा तापमानाचा पारा वाढल्यामुळे आणि उष्ण लाटांमुळे जळगावचं जनजीवन प्रभावित झाले आहे. उद्यापासून पुढचे तीन दिवस 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. नागरिकांना मेचा तडाखा आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे. उष्णता वाढल्याने नागरिक शीतपेय आणि रसवंतीच्या दुकानांवर गर्दी करत आहेत.

दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यांवर शुकशुकट दिसतोय. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जास्तीत जास्त पाणी प्यावे असं जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील विदर्भात ऐन मे महिन्यात पावसाचे सावट कायम आहे. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मे महिन्याचा पंधरवडा लोटूनही विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळीवाऱ्यासह गारपीट अनुभवायला येत आहे. त्यामुळे शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.