⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्लॉटच्या वादातून मुलानेच जन्मदात्या आईला संपविले ; एरंडोलमधील धक्कादायक घटना

प्लॉटच्या वादातून मुलानेच जन्मदात्या आईला संपविले ; एरंडोलमधील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्लॉट विक्रीच्या वादातून ‘मदर्स डे’च्या दिवशीच मुलगा आणि सुनेने मिळून आईचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (६०) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विमलबाई यांच्या घराशेजारी त्यांच्या नावे असलेला प्लॉट मुलगा बापू मोहिते (४०) व सून शिवराबाई मोहिते (३५) यांना विकायचा होता. परंतु यास विमलबाईंचा विरोध होता. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांना त्रास द्यायचे त्यामुळे विमलबाई ह्या मुसळी (ता. धरणगाव) येथे गेल्या होत्या. समाजातील काही लोकांनी मुलगा व सुनेची समजूत घातली आणि विमलबाई यांना एरंडोल येथे एकत्र राहण्यास राजी केले.

मात्र रविवारी पहाटे साडेतीन वाजता मुलगा आणि सुनेने दगडाने ठेचून विमलबाई मोहिते यांचा निघृण खून केला. या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने फिर्याद दिली. त्यावरून एरंडोल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.