जळगाव ते पुणे विमानसेवेबाबत मोठी अपडेट समोर

मे 11, 2024 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली जळगाव येथून विमानसेवा सुरु करण्यासाठी फ्लाय 91 कंपनीने पुढाकार घेत उडान योजनेंतर्गत गेल्या महिन्यात जळगाव विमानतळावरून गोवा आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यानंतर जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने फ्लाय 91 कंपनीकडून हालचाली सुरू होत्या. यामुळे जळगावकरांना जळगाव-पुणे विमानसेवेची उत्सुकता लागली आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

jalgaon airport jpg webp

जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील असलेल्या फ्लाय 91 कंपनीला पुण्यातील सैन्य दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाकडून आवश्यक ती परवानगी देखील मिळाली आहे. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साधारण 25 मे पासून जळगाव ते पुणे नियमित विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या.

मात्र, जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किमान 15 दिवस तरी लागू शकतात. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस जळगावहून पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणे तूर्त शक्य नसल्याचे दिसून आले आहे. जळगाव विमानतळाला अद्याप पुणे विमानसेवेचे अधिकृत पत्र आणि उड्डाणाचे वेळापत्रक प्राप्त झालेले नाही. त्यामुळे फ्लाय 91 कंपनीने पुणे विमानतळासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्त अजुनही केलेली नाही. दरम्यान, येत्या 16 मे पासून जळगावहून गोव्यासाठी आता दररोज विमान झेपावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now