⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

वेळेवर उपचार मिळाल्याने बालकाच्या प्रकृतीत सुधारणा ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांचा सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका लहान मुलावर शनिवारी २२ रोजी संध्याकाळी कुत्र्याने जबर हल्ला केला होता. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपत्कालीन विभागात यशस्वी उपचार झाले. यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि डॉक्टरांचा गुरुवारी २७ मे रोजी सकाळी ११ वाजता सत्कार केला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग (नेत्रकक्ष) येथे दररोज कुत्रा चावला म्हणून औषधोपचार करण्यासाठी रुग्ण येत आहेत. शनिवारी २२ मे रोजी कळमसरा येथे संध्याकाळी अंगणात खेळत असताना यश महेंद्र सोनवणे या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता.  त्याच्यावर खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार झाले. मात्र आवश्यक इंजेक्शन नसल्याने त्याच्या पालकांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना फोन करून मदत मागितली. त्यांनी तत्काळ त्याला होकार देऊन त्याच्यावर रुग्णालयातील नेत्र कक्षात (आपत्कालीन विभाग) येथे उपचार सुरु केले. त्यामुळे मुलाला दिलासा मिळाला.

बालकावर वेळेवर उपचार मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भेट देत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय पथकाचे आभार मानत त्यांचा फुल देऊन सत्कार केला.  यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, अधिसेविका  कविता नेतकर, अधिपरिचारिका जोगी, काँग्रेसचे कार्यकर्ते कैलास पाटील आदी उपस्थित होते.