स्मिताताई वाघ यांनी दिली कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भेट

एप्रिल 27, 2024 3:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे जतन करून ठेवल्या आहेत. बहिणाबाईंच्या ओव्या असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील त्या सतत प्रेरित करत असतात. जळगाव शहराला देखील विकासाच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे, त्यासाठी कमळ फुलवण्याचा निर्धार उपस्थित सर्वांनी यावेळी केला.

Smita Wagh bahinabai home jpg webp

भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी जुन्या जळगावातील बौद्ध विहार तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी जळगाव आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, भारतीताई सोनवणे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेशाम चौधरी, दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर सुनील ख़डके, कैलास सोनवणे, ज्योतीताई निंभोरे, अरविंद देशमुख, अमित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, आशुतोष पाटील, मुकुंद मेटकर, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अमित भाटिया, किशोर चौधरी, सरोज पाठक, चंदन महाजन, डॉ. विरन खडके, अमित काळे, सुचिता हाडा, दिपमाला काळे, प्रकाश बालाणी, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीप्ती चिरमाडे, भाग्यश्री चौधरी, रंजना वानखेडे, लीला चौधरी, मुकुंदा सोनवणे, ललित बडगुजर, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, महेश पाटील, आनंद सपकाळे, नितीन इंगळे, महेश जोशी, अजित राणे, राहुल घोरपडे, जयेश ठाकूर, पियुष कोल्हे, शक्ती महाजन, विकी सोनार, रियाझ शेख, मयूर शिंपी, मिलिंद चौधरी, धनंजय चौधरी आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now