आयटा (AIITA) ची नूतन कार्यकारणी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । अखिल भारतीय आदर्श शिक्षक संघटना (AIITA) ची वर्ष २०२१-२२ साठी नूतन कार्यकारणी नुकतेच जाहीर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील सर्व स्थानिक अध्यक्ष व सचिव जिल्ह्याची कार्यकारणी निवडतात आणि त्यांच्या नावांची घोषणा राज्य सचिव करतात. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक अध्यक्षांच्या मताने या संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिनविरोध साजिद अब्दुल रऊफ शेख (मिल्लत उर्दू प्राथमिक शाळा, मेहरूण, जळगाव) तर रियाज जाफर शाह (इकरा उर्दू हायस्कूल, जळगाव) यांच्या उपजिल्हाध्यक्ष पदावर सहमती दर्शविली.
त्याच वेळी आरिफ नाझीम खान (जिल्हा परिषद उर्दू शाळा, शेंदुर्णी, जळगाव) यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती अंमलात आली. तसेच जानीसार अख्तर अब्दुल हमीद शेख (शेख अल-हिंद उर्दू प्राथमिक शाळा, मेहरूण, जळगाव) यांची जळगावचे स्थानिक अध्यक्ष तर रफिक मुहम्मद खान (मिल्लत उर्दू प्राथमिक शाळा, मेहरॉन जळगाव) यांची स्थानिक उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच, जळगाव शहराचे स्थानिक सचिव म्हणून शेख झुबैर मुसा (नाझीम मलिक उर्दू प्राथमिक शाळा, जळगाव) निवडले गेले.
आयटा ही अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक आणि शिक्षणाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी प्रयत्न करणारी एकमेव नोंदणीकृत शिक्षक संघटना आहे. आयटाचे राज्य सचिव सय्यद शरीफ़ यांनी सदर नावांची नुकतेच घोषणा करून सर्व नवनियुक्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.