महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या नामनिर्देशन अर्ज दाखल करणार ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची राहणार उपस्थिती

एप्रिल 24, 2024 8:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । महायुतीचे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे उद्या म्हणजेच गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहजिल्ह्यातील तिन्ही मंत्री शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांचीही उपस्थिती राहणार आहे.

raksha khadse smita wagh bjp jdcc bank

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्व उमेदवारांचा जोरात सुरु असून आता नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजपाचे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे यांचा उद्या दि. २५ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज भरला जाणार आहे. त्यांची शहरातील शिवतीर्थ येथून नामांकन रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी, ग्रामविकास मंत्री ना गिरीशभाऊ महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल.

दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण (महायुतीचे समन्वयक), संजय पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक) आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के. अण्णा पाटील, माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा),अमोल हरिभाऊ जावळे (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा), उज्वलाताई बेंडाळे ( जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा भाजपा), नंदकिशोर महाजन (भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख), डॉ.राधेश्याम चौधरी, (भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख), निलेश पाटील (जळगाव जिल्हाप्रमुख शिवसेना), रावसाहेब पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), वासुदेव पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), जमील देशपांडे (जिल्हाध्यक्ष मनसे), अभिषेक पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगराध्यक्ष) सौ.मीनल ताई पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) सौ. सोनालीताई नारायण पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) सौ.सरिताताई माळी-कोल्हे (शिवसेना), गणेशभाऊ सोनवणे (शिवसेना), आनंदभाऊ खरात ( आठवले गट), अनिल अडकमोल (आठवले गट आरपीआय) राजूभाऊ मोरे (जोगेंद्र कवाडे गट), दिनेश खरात (लहूजी सेना ), श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now