आता जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरु ; ही सुविधा होणार उपलब्ध

एप्रिल 22, 2024 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२४ । आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयीक सर्व माहिती द्यायची आहे.

matadan kendra jpg webp

त्यात मतदानापूर्वी आपली मतदार यादीत नाव कसे बघायचे, स्लिप कशी काढायची,पुराव्यासाठी 12 पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे सुविधा केंद्र 8 मे पर्यंत उभारले जाणार आहेत. मतदान सुविधा केंद्र उभारून जनजागृती बाबतचे आदेश सुरु केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

याबाबत ०३ जळगांव लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच दिनांक १३ मे २०२४ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याव्दारे बाजारात येणाऱ्यासर्व मतदारांना निवडणुक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे त्यातमतदान केंद्राचा तपशिल, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधुन देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले वोटर हेल्पलाईन अँप बाबत मतदारांना माहिती देणे, मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले १२ पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now