प्रवाशांना दिलासा ! भुसावळमार्गे कोल्हापूर ते गोंदियासाठी आज विशेष गाडी धावणार, कोण-कोणत्या स्थानकावर थांबेल?

एप्रिल 22, 2024 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्युज : २२ एप्रिल २०२४ : भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोल्हापूर ते गोंदिया आणि नागपूर दरम्यान उन्हाळी विशेष एकेरी फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याची प्रवासाची सोय होणार आहे.

train jpg webp

क्र. ०१४८९ ही विशेष गाडी कोल्हापूर येथून २२ रोजी सोमवारी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता गोंदिया येथे पोहोचेल.तसेच क्र. ०१४९० ही विशेष गाडी कोल्हापूर येथून २३ रोजी दोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाबारा वाजता नागपूर येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला भुसावळ विभागात मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर येथे थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now