अंगाची लाहीलाही होणार ! जळगावातील तापमान जाणार चाळीशी पार

एप्रिल 14, 2024 11:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२४ । सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. या अवकाळी पावसाने पिकांना चांगलंच झोपडलं आहे. जळगावसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे घरे, शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अगदी मेटाकुटीला आले आहेत.दरम्यान, आजही राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसानंतर जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशावर जाणार आहे.

tapman 1 jpg webp

मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाच्या सावटामुळे तापमानात घसरण झालीय. जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, वादळी पाऊस झाला आहे. यामुळे दिवसाचे तापमान ३८ अंशापर्यंत खाली आल्याने उकाड्यापासून जळगावकरांना काहीसा मिळाला. मात्र आता १४ ते १७ एप्रिल दरम्यान वातावरण सामान्य राहील.

कमाल तापमान ३९ ते ४३ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वादळ, पाऊस आणि ढगाळ वातावरणाच्या स्थितीनंतर १४ तारखेपासून दररोज उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी पाऊस असला तरीही भारतामध्ये विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटा सुरू आहेत. हवेची दिशा जर बदलल्या गेली तर तापमानात वाढ होईल.

आज राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आज रविवारी भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now