अखेर शोध संपला ; शरद पवार गटाकडून रावेरचा उमेदवार ठरला, आज सायंकाळपर्यंत होणार घोषणा

एप्रिल 8, 2024 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर सुरु असलेला तिढा अद्याप सुटला नाहीय. महायुतीकडून रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली असून दुसरीकडे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) सक्षम उमेदवाराचा शोध अनेक दिवसांपासून घेत होती.

sharad pawar 1 jpg webp

अखेर हा शोध संपला असून अ‍ॅड. रवींद्र भैय्या पाटील यांची रावेरच्या लोकसभा मतदार संघातून वर्णी लागली आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरजचंद्र पवार गटातील सूत्रांनी दिली आहे. अ‍ॅड रवींद्र भैय्या पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत.

दरम्यान, एकीकडे आमदार एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार असताना, दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्याकरिता सोमवारी पुणे येथील ‘मोदी बागेत’ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. आजच्या या बैठकीत सायंकाळपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रावेर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now