⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच ; तपासा आजचे दर

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच ; तपासा आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ ।  राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. एक दिवसआड करून होणाऱ्या इंधन दरवाढीने देशात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ केली आहे.

तेल कंपन्यांनी गुरुवारी विविध शहरांमधील पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ केली आहे. याआधी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.

आजच्या भाववाढीने जळगावमध्ये पेट्रोल प्रति लिटर  १००.८६ इतका आहे. तर डीझेल प्रति लिटर ९१.२८ इतका आहे.

इतर मोठ्या शहरांमधील दरवाढ?

आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.९४ रुपयांवर झाला आहे. यापूर्वीच मुंबईत प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. आता साधे पेट्रोल १०० रुपये होण्यासाठी ६ पैशांची तफावत आहे. उद्या किंवा परवामध्ये पेट्रोल १०० रुपयांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आज दिल्लीत पेट्रोल ९३.६८ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.७२ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९१.८७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.६१ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.३९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.४६ रुपये प्रती लीटर झाले आहे.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.