Yawal : डॉ. योगेश्वरी दिनकर पाटील (क्षीरसागर) हिचे वैद्यकीय क्षेत्रात यश

एप्रिल 3, 2024 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । डॉ. योगेश्वरी दिनकर पाटील(क्षीरसागर)हिने नुकतीच वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याबद्दल यावल शहरासह तालुक्यातुन सर्वच स्थरातून तिचे कौतुक होत आहे.

Dr Yogeshwari Patil jpg webp

डॉक्टर योगेश्वरी पाटील या साईबाबा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊराव माणिकराव पाटील व ताराबाई विरावली यांची नात असून साई बाबा संस्थेचे संचालक तथा प्रगतशील शेतकरी दिनकर पाटील व जि.प शाळा सातोद येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या कन्या आहेत.

त्यांनी शिरपूर येथील के.डी.एम.जी होमिओपॅथ या महाविद्यालयातुन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना त्यांच्या विद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक डॉ. बी एस पाटील,प्रा डॉ संजय रुद्र यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ योगेश्वरीचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत सत्कार केला. तसेच तिचे कौतुक करत अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now