वाणिज्य

1 एप्रिलपासून रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा होणार सुरू, काय आहे घ्या जाणून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२४ । भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन नियम लागू करत असतात. आता अशातच 1 एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्षाचे नवी सुरवात होणार असून रेल्वे प्रवाशांसाठी काही नवीन सुविधाही देण्यात येणार आहेत.

नवीन बदल पेमेंटशी संबंधित आहे. 1 एप्रिलपासून, रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाइन (Online) पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी QR कोड स्कॅनिंगची सुविधा सुरू करणार आहेत. आता रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करताना QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय असेल. गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI ॲप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करू शकतील.

तिकीट काउंटरसोबतच पार्किंग आणि फूड काउंटरवर प्रवाशांसाठी क्यूआर कोडचीही व्यवस्था असेल. क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाइन पेमेंट करू शकतील. मात्र, अनेक स्थानकांवर ही सुविधा आधीच उपलब्ध आहे. ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन आता दंडाची रक्कम त्वरित ऑनलाइन जमा करता येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनल मशीनची सुविधा असेल. या डिव्हाईसमधील क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाइन दंड भरण्यास सक्षम असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button