जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर ; जाणून घ्या तारखा..

मार्च 30, 2024 1:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत.

holiday jpg webp

या दिवशी राहणार सुट्टी
यामध्ये सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक 02 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now