अरे वा! एप्रिलपासून भुसावळमार्गे सुरू होणार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या, वाचा कुठून कुठपर्यंत धावणार

मार्च 30, 2024 9:19 AM

जळगाव लाईव्ह न्युज : ३० मार्च २०२४ : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एप्रिलपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्या भुसावळ मार्गे धावणार आहेत. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांची सोय होणार आहेत.

railway 2 jpg webp

लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस
यात, क्र. ०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडी ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:०५ वाजता बनारस पोहचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, ज्योनाथपूर आणि वाराणसी असे थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस प्रयागराज साप्ताहिक
क्र. ०१०४५ लोकमान्य टिळक टर्मिनस प्रयागराज साप्ताहिक विशेष गाडी २ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर इथे थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर साप्ताहिक
क्र. ०११२३ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर साप्ताहिक विशेष गाडी ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी मुंबई येथून २२:१५ वाजता सुटेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई, ओराई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती या ठिकाणी थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्विसाप्ताहिक
क्रमांक ०१४०९ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत सोमवार आणि शनिवार रोजी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा येथे थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस समस्तीपूर साप्ताहिक
लोकमान्य टिळक टर्मिनस समस्तीपूर साप्ताहिक विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर इथे थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now