चिमुकल्यांनी अनुभवला पदवीग्रहण सोहळा ; डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल भुसावळचा उपक्रम

मार्च 22, 2024 6:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२४ । पदवीग्रहण सोहळा म्हटले की महाविद्यालयीन तरूण तरूणी डोळयासमोर येतात. पण भुसावळच्या पालक व चिमुकल्यांनी पदवीग्रहण सोहळा नुकताच अनुभवला. निमीत्‍त होते डॉ. उल्हास पाटील .

graduation ceremony jpg webp

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल भुसावळा येथील सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ प्री ग्रॅज्युएशन संमारभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने प्रमुख अतिथी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, प्रिन्सीपल अनघा पाटील हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये सुरु असलेले कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे कौतुक केले. करण्यात आली.

graduation ceremony 2

मग नृत्य सादर करून चिमुकल्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी बालकांनी व पालकांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अर्चना इंगळे मॅडम व आभार प्रदर्शन श्री. स्वप्नील बेलोशे सर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now