ब्लॉकमुळे भुसावळहुन धावणारी ही ट्रेन आज रद्द

मार्च 22, 2024 10:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातील बिसवाब्रिज येथे डाऊन लूप लाइनची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी आज शुक्रवारी (दि.२२) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ ते वर्धा मेमू गाडी शुक्रवारी रद्द केली आहे. तर वर्धा ते भुसावळ मेमू गाडी शनिवारी (दि.२३) धावणार नाही.

bhusawal railway station jpg webp

अजमेर ते पुरी एक्सप्रेस भुसावळ ते मलकापूर दरम्यान एक तास थांबवण्यात येईल, मडगाव ते नागपूर विशेष गाडी ही सुद्धा भुसावा ते मलकापूर दरम्यान एक तास थांबवली जाणार आहे. अंदुरा नांदेड एक्स्प्रेसला भुसावळ ते बोदवड दरम्यान ४५ मिनिटे शुक्रवारी थांबा देण्यात येईल, असे प्रशासनाने कळवले.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून मेमू गाडी वारंवार रद होत असल्याने ऐन उन्हाळ्यात व सणासुदीच्या दिवस्रांत प्रवाशांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही प्रतीक्षा यादी वाढती असल्याने आरक्षण मिळत नसल्याचे चित्र प्रकर्षाने समोर येते आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now