⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | नोकरी संधी | 10वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! नवोदय विद्यालयात 1377 पदांसाठी बंपर भरती

10वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! नवोदय विद्यालयात 1377 पदांसाठी बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नवोदय विद्यालयात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नवोदय विद्यालय समिती (NVS) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची अधिसूचना जारी झालीय. भरतीसाठी इच्छुक उमेदवार NVS navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. NVS Bharti 2024

या भरतीअंतर्गत एकूण 1377 पदे भरली जातील. जर तुम्हालाही नवोदय विद्यालयात काम करण्याची इच्छा असेल, तर अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा. Navodaya Vidyalaya Samiti

या पदांवर भरती होणार
1) स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05
3) ऑडिट असिस्टंट (Group-B) 12
4) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04
5) लीगल असिस्टंट (Group-B) 01
6) स्टेनोग्राफर (Group-B) 23
7) कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02
8) कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
10) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
11) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
12) लॅब अटेंडंट (Group-C) 161
13) मेस हेल्पर (Group-C) 442
14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19

आवश्यक शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.Com
पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

इतकी अर्ज फी भरावी लागेल
फिमेल स्टाफ नर्स पदांसाठी जे काही उमेदवार अर्ज करत असतील, तर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1500 असेल आणि SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना रु. 500 भरावे लागतील. इतर पदांसाठी अर्ज शुल्क सर्व उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील.
जाहिरात (Notification): पाहा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.