गोदावरी अभियांत्रिकीत (आयसीआरइएसटी-२०२४) ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे व इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनोवेशन्स इन इंजिनिअरिंग अँड सायन्स आयजेआयईएस(आयजेआयईएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी श्री रितेश नेहेते (डोमेन कन्सल्टंट- क्लाऊड क्रॉस फंक्शन सर्विस, लीड अँड एंगेजमेंट ओनर -प्रोसेस अँड कंपलाईन्स टीसीएस पुणे) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (समन्वयक) प्रा. विजय डी चौधरी (उपसमन्वयक) तसेच सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग आणि सहभागी संशोधक उपस्थित होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी परिषदेमध्ये सादर होणार्या संशोधन तसेच संशोधनासाठी उपस्थित असलेल्या तज्ञ मार्गदर्शक यांच्या बद्दल माहिती दिली. तसेच संशोधन व नाविन्यता याबद्दल सांगताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स यांच्या माध्यमातून सद्यस्थितीतील सर्व प्रकारच्या शाखांच्या प्रणालीचा विकास यावर भाष्य केले. त्यानंतर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वेगवेगळ्या विभागातून पेपर्स आले आहेत व प्रत्येक वर्षी रिसर्च चे आकडे हे निरंतर वाढत आहे हे कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीने संशोधनाची वाढती वाटचाल राहील ही अपेक्षा व्यक्त केली.
तसेच विकसित भारताचे स्वप्न यामध्ये प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे. त्यांनी परिषदेमध्ये आलेल्या सर्व संशोधकाना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर रितेश नेहते यांनी एआयचे भविष्य कोंडी आणि औद्योगिक क्रांतीसाठी शिफारस हा होता.आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सांगताना बाहेरील जगामध्ये याबद्दल बरेच गैरसमजुती वर भाष्य करताना फक्त काम करण्याची पद्धत बदललेली आहे पण यामुळे कोणतेही जॉब जाणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स बद्दल सांगताना लिखाण, आवाज निर्मिती, व्हिडिओ उत्पादन ट्रान्सलेशन, मुखपृष्ठ बनविणे हे ऑटोमॅटिक कसे होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात एआय इथिक्स, गार्टनर जनरेटिव्ह एआय फ्रेमवर्क, ए आय ऑटोमेशन, रियल लाइफ एक्झामपल्स व रिकमेंडेशन याबद्दल माहिती दिली.त्यानंतर अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे संशोधनकर्ते कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व बेसिक सायन्सेस या विषयांमध्ये आपले संशोधन ऑनलाइन पद्धतीने सादर केले.संशोधन सादर करतेवेळी तज्ञ मार्गदर्शक (ीशीीळेप लहरळी) म्हणून प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
कॉम्प्युटर विषयासाठी डॉ. इंद्रभान बोरसे (एसएसव्हीपीएस, धुळे) इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमिनिकेशन व बेसिक सायन्सेस अँड ह्युमेनिटीज साठी डॉ. धम्मानंद शिराळे (विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स, कबचौउमवि), मेकॅनिकल साठी डॉ. आशिष विखार(गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, जळगाव) व इलेक्ट्रिकल साठी डॉ. अमित बोरोले (एमआयटी, औरंगाबाद) यांचे अनमोल सहकार्य लाभले.सदर परिषदेसाठी कॉम्प्युटर विभागात ३६ संशोधन पेपर प्राप्त झाले असून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागात ३०, मेकॅनिकल विभागात १८, इलेक्ट्रिकल विभागात ७ व बेसिक सायन्सेस विभागात २ संशोधन असे ९३ पेपर सादर केले जाणार आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे अधिष्ठाता व आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा.हेमंत इंगळे व उपसमन्वयक प्रा. विजय डी. चौधरी यांनी परिषदेचे नियोजन केले होते. परिषदेच्या सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधकांचे मार्गदर्शन लाभले.सदर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्या), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी शुभेच्छा दिल्या व आयोजनाबद्दल कौतुक केले.सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शिरीन पिंजारी यांनी केले.