⁠ 
सोमवार, मे 20, 2024

टीईटी घोटाळ्यावरून खडसेंनी साधला शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी (NCP)काँग्रेस शिक्षक आघाडी तसेच ग्रंथालय सेल तर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांची उपस्थिती होती.या दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी टीईटी घोटाळ्यावरून (TET Scam) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

टीईटी या घोटाळ्यामध्ये सरकारमधील मंत्र्यांच्या मुलांचा सहभाग असताना दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडूनच या घोटाळ्याची चौकशी होते, हे दुर्दैवी असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले. तसेच जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागात फार मोठा गोंधळ आहे. गैरव्यवहार व भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. अनेकदा मी विधान परिषदेत तक्रारी केल्या. त्याची चौकशी सुद्धा झाली. लोडींग आणि अनलोडींगचा ठेका एका गुंडाला दिला असल्याचा आरोपही यावेळी खडसेंनी केला. यात खालपासून वरपर्यंत सर्वांचे हात भ्रष्टाचारने बरबटले आहेत. हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. त्यामुळे हिला हात लावायला कुणी तयार नाही, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.

एकनाथ खडसे यांनी आजच्या शिक्षण पद्धतीत होत असलेल्या बदलावर त्यांचे मत व्यक्त केले. वारंवार अभ्यासक्रम बदलामुळे शिक्षणात अस्थिरता येते. त्यामुळेच एकच अभ्यासक्रम दीर्घ कालीन असला पाहिजे, अस मत व्यक्त करत याबाबत सरकारला याबाबत मागणी करणार असल्याचेही खडसे म्हणाले. प्रशांत बंब आणि शिक्षकांमध्ये सुरू असलेला वाद हा दुदैवी प्रकार आहे. आपसात समन्वय साधून त्यांनी मिटवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली.