जळगावात फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला भीषण आग ; लाखोंचे नुकसान

मार्च 10, 2024 3:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली असून या आगीत लाखो रूपयांच नुकसान झाले. महापालिकेच्या ७ बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

JL Fire jpg webp

जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा रा. शिवधाम मंदीर, जळगाव याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देऊळ, खुर्ची, कपाट आदि सामान बनविले जाते. त्यांच्याच बाजूला देवकिरण विलास पाटील रा. निवृत्ती नगर, जळगाव याचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवारी १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता फर्निचर दुकानाला अचानक आग लागली.

या आगीत विल्स फर्निचर दुकान आणि वाशिंग सेंटर मधील सामान जळून खाक झाले आहे. यात विल्स दुकानात असलेले सागवान लाकूड, मशिनरी व तयार वस्तू जळून अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाले तर वाशिंग सेंटर मधील कार वाशिंग मशिन, व्हक्यूम क्लीनअर मशिनी, कोटींग मशिन, फर्निचर आदी असा अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे एकुण ७ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. व आग विझविण्यात आली. दरम्यान याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now