जळगाव जिल्हा

होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे भुसावळमार्गे चालवणार या शहरांदरम्यान विशेष ट्रेन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 8 मार्च 2024 | होळीसाठी अनेक जण कुटुंबासह आपापल्या गावी परत जात असतात. यादरम्यान, रेल्वे गाड्यांमद्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यातच मध्य रेल्वेने होळीनिमित्त चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. विशेष यातील काही गाड्या भुसावळ मार्गे धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पुणे-कानपूर-पुणे
गाडी क्रमांक 01037, पुणे ते कानपूर विशेष गाडी 20 मार्च 2024 आणि 27 मार्च 2024 रोजी पुण्याहून सकाळी 6:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:10 वाजता कानपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01037, कानपूर ते पुणे विशेष गाडी 21 मार्च 2024 आणि 28 मार्च 2024 रोजी कानपूरहून 8:50 वाजता सुटेल आणि 12:05 वाजता पुण्याला पोहोचेल.
या स्थानकावर असेल थांबा
दौंड चोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मरमदुके, भुसावळ, खंडवा, इटारसी, बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, राणी कंपलपती या ठिकाणी ही गाडी थांबणार आहे.

पुणे-सावंतवाडी-पुणे
गाडी क्रमांक 01445, सावंतवाडी विशेष गाडी 8 मार्च 2024, 15 मार्च 2024, 22 मार्च 2024 आणि 29 मार्च 2024 रोजी सकाळी 9:35 वाजता पुण्याहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 23:30 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01446, पुणे विशेष गाडी सावंतवाडीहून 10 मार्च, 17 मार्च , 24 मार्च आणि 31 मार्च 2024 रोजी दुपारी 23.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:15वाजता पुण्याला पोहोचेल.
ही गाडी कल्याण, लोणावळा, पनवेल रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली आणि कुडाळ येथे थांबेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button