उन्हाळ्यात कडाक्याची थंडी ! जळगावातील किमान तापमानात सहा वर्षानंतर पहिल्यांदाच झाला हा बदल
जळगाव लाईव्ह न्यूज । 6 मार्च 2024 । उत्तरेतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून जळगावातील तापमानात घट झाली. काल मंगळवारी सहा वर्षानंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात जळगावचा किमान पारा ११.८ अंशापर्यंत खाली आला होता. यामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. जळगावकर मार्चमध्ये नोव्हेंबर सारख्या थंडीची अनुभूती घेत आहेत.
सध्याच्या बदलत्या ऋतुमानामुळे हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात कडाक्याचे ऊन तर उन्हाळ्यात कडाक्याची थंडी असे ‘सरप्राईज वेदर’ चा सामना जळगावकरांना करावा लागत आहे. मार्च महिन्यात जळगाव शहरात उन्हाची तीव्रता वाढते. मात्र, सध्या उन्हाची तीव्रता नाही तर थंडीचा गारवा वाढला आहे.
गेल्या फेब्रुवारीच्या शेवटी तापमान जळगावचे तापमान ३७.८ अंशावर होते. तर किमान तापमान २० अंशांपुढे गेले. यामुळे उन्हच्या झळा बसत होत्या. मात्र त्यानंतर तापमान घसरून ३० अंशांवर आले. यातच काल मंगळवारी (५ मार्च) जळगाव शहरातील रात्रीचा पारा गेल्या सहा वर्षानंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात ११ अंशावर आला आहे. यामुळे हिवाळ्याप्रमाणेच वातावरणात गारवा निर्माण झाला होता. विशेष करून रात्री व पहाटे हुडहुडी अधिकच जाणवत होती. रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातदेखील घट झाली असून, मंगळवारी दिवसाचा पारा ३० अंशावर आला होता. बदलत्या हवामानाचा फटका आरोग्याला बसत असून, सर्दी व तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत
९ मार्चपर्यंत राहणार थंडीचा जोर…
हिमालयालगतच्या राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा जोर वाढला आहे. त्यातच वातावरण कोरडे असल्याने उत्तरेकडील वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे, अजून ९ मार्चपर्यंत थंडीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आहे. मात्र, त्यानंतर तापमानाला वाढ होण्याचा अंदाज आहे