⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

दहावी : जळगाव जिल्ह्यातील १८९ शाळांचा १०० टक्के निकाल

जळगाव लाईव्ह न्यूज : २ जून २०२३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून बसलेल्या ५६ हजार ५६६ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ०६१ मुलं व २३ हजार ६६८ मुली असे एकूण ५२ हजार ७२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९३.२१ टक्के लागला. जिल्ह्यात बोदवड तालुका वगळता सर्व तालुक्यांचा निकाल ९० टक्क्यांच्यावर लागला आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा तब्बल १८९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.

Redmi K50i फोन स्वस्तात खरेदीचा चान्स

तालुकानिहाय निकाल
अमळनेर : ९४.९९ टक्के
भुसावळ : ९४.९० टक्के
बोदवड : ८७.८६ टक्के
भडगाव : ९४.४७ टक्के
चाळीसगाव : ९२.६९ टक्के
चोपडा : ९३.८२ टक्के
धरणगाव : ९५.८० टक्के
एरंडोल : ९४.६५ टक्के
जळगाव : ९०.५१ टक्के
जामनेर : ९२.०३ टक्के
मुक्ताईनगर : ९०.३७ टक्के
पारोळा : ९३.२७ टक्के
पाचोरा : ९४.३८ टक्के
रावेर : ९०.६६ टक्के
यावल : ९४.४६ टक्के
जळगाव शहर : ९५.९४ टक्के

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करा अर्ज

दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यास विषयाची गुण पडताळणी करणे, उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागवून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन माध्यमातून स्वत:, शाळांमार्फत http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढील पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. गुण पडताळणीसाठी दि. ३ ते १२ जून तसेच छायाप्रत मागविण्यासाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. डेबीट, क्रेडिट कार्ड तसेच यूपीआय आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे.

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी IBPS मार्फत 8600+ जागांसाठी भरती