जुन्या वादातून एकावर गोळीबार ; जळगावातील खळबळजनक घटना

मार्च 2, 2024 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत असून यातच जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा प्रकार मेहरूण परिसरात घडला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Untitled design 6 jpg webp

जळगाव शहरातील मेहरून परिसरात शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दादू सोनवणे याने जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या, पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पुढील कारवाईला सुरुवात करत आहे. दरम्यान गेल्या ३ दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून गावठी पिस्तूल हस्तगत करण्याची घटना समोर आले आहे.

यातच आता मेहरूण परिसरात दोन जणांनी गोळीबार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला याबाबत आत्तापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now